समास



मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-
कधी तो काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे
जोडशब्द बनवितो,
उदा. पोळीसाठी पाट या दोन शब्दांऐवजी पोळपाट
असा जोडशब्द
वापरतो. मराठी भाषेत दोन
किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचे
एकत्रीकरण करून त्यांचा एक शब्द
करण्याची परंपरा पुष्कळ
जुनी आहे. या व्यवस्थेने शब्दांचा संक्षेप होऊन
थोड्या शब्दांत
पुष्कळ अर्थ व्यक्त होतो आणि भाषेत
आटोपशीरपणा येतो.
शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द
तयार
होतो त्याला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.
हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार
झाला हे स्पष्ट
करण्यासाठी त्याची फोड करून
सांगण्याच्या पद्धतीला 'विग्रह'
असे म्हणतात.

समासात किमान दोन शब्द किंवा पडे एकत्र येतात.
या दोन
शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे
त्यावरून समासाचे
चार प्रकार पडतात.

क्र.
समासाचे नाव
प्रधान पद
उदाहरण
१.
अव्ययीभाव
पहिले
आजन्म, पदोपदी
२.
तत्पुरुष
दुसरे
राजवाडा, गायरान
३.
द्वंद्व
दोन्ही
पितापुत्र, बरेवाईट
४.
बहुव्रीही
अन्य
चंद्रमौली, गजमुख

● अव्ययीभाव
"ज्या समासातील पहिले पद बहुदा अव्यय असून ते
प्रमुख असते व
ज्या सामासिक शब्दाचा वापर
क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समसाला '
अव्ययीभाव
समास' असे म्हणतात."
उदाहरणार्थ-
यथाक्रम - क्रमाक्रमाणे
प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला

● तत्पुरुष
दुसरे पद महत्त्वाचे -
उदा० महाराज
द्वंद्व
दोन्ही पदे महत्त्वाची -
उदा० रामकृष्ण

● बहुव्रीहि
दोन्ही पदांव्यतिरिक्त अनुल्लेखित शब्दाकडे निर्देश
-
उदा० नीलकंठ

● समासविषयक काही महत्त्वाच्या गोष्टी-
1. एकाच सामासिक शब्दांचे विग्रह
वेगवेगळ्या प्रकारे
करता येतात
2. समासातील पदे संस्कृतातून आलेली (तत्सम)असतील
तर
त्यांचा संधी करावा. जसे
विद्या+अभ्यास=विद्याभ्यास,
3. मराठीत शब्दांचा संधी करण्याकडे कल नसतो. तोंड
+ओळख=तोंडओळख
4. भिन्न भाषांतील शब्दांचा समास
टाळावा.हेड्शिक्षक(हेडमास्त
ठिक),डाकगृह(डाकघर ठीक आहे),गृहजावई(घरजावई
बरोबर
आहे).